दर करार, निविदेत ‘कृषी’च्या योजनांना ‘ब्रेक’!
By Admin | Updated: April 2, 2016 01:35 IST2016-04-02T01:10:25+5:302016-04-02T01:35:59+5:30
अकोला जिल्हा परिषदेचा १ कोटी २0 लाखांचा निधी अखर्चित; लाभार्थी शेतकरी वंचित.

दर करार, निविदेत ‘कृषी’च्या योजनांना ‘ब्रेक’!
संतोष येलकर/अकोला
अकोला जिल्हा परिषदेचा १ कोटी २0 लाखांचा निधी अखर्चित; लाभार्थी शेतकरी वंचित
जिल्हा परिषदेच्या कारभारात ह्यमार्च एन्डह्ण ला विविध कल्याणकारी योजना बारगळल्या. त्यामध्ये दर करार आणि ई-निविदा प्रक्रिया व पुरवठा आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याने, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या १ कोटी १९ लाख ५0 हजारांच्या योजनांना ह्यब्रेक ह्ण लागला आहे. कृषीच्या योजना मार्गी लागल्या नसल्याने, जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
सन २0१५-१६ या वर्षात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९0 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी विविध १७ योजना राबविण्याकरिता ३ कोटी ५३ लाख ५0 हजार रुपयांची तरतूद मंजूर होती. गत वर्षभराच्या कालावधीत कृषी विभागाच्या एकूण १७ योजनांपैकी २ कोटी ३४ लाख रुपयांच्या दहा योजना मार्गी लागल्या. जिल्हा परिषदेच्या कारभारात कृषी विभागाच्या उर्वरित सात योजनांचा १ कोटी १९ लाख ५0 लाखांचा निधी अखर्चित राहिला. शासनाकडून दर करार उपलब्ध झाले नाही, तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब झाल्याने योजनांच्या साहित्य खरेदीसाठी पुरवठा आदेश देण्यात आला नाही. त्यामध्ये कृषी विभागाच्या सौरकंदील, प्लास्टिक ताडपत्री, कॅनव्हास ताडपत्री, पॉवर स्प्रे पंप, स्पायरल सेपरेटर, नॅपसॅप स्प्रे पंप व पोरस पाइप इत्यादी सात योजना ३१ मार्चपर्यंत (मार्च एन्ड) मार्गी लागू शकल्या नाही. निधी उपलब्ध असूनही, कृषी विभागाच्या योजनांना ह्यब्रेक ह्ण लागल्याने, जिल्ह्यातील शेतकर्यांना या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.