तुकाराम चौकात शिवसनेने केले ‘रास्ता रोको’ आंदोलन

By Admin | Updated: May 3, 2017 14:42 IST2017-05-03T14:42:04+5:302017-05-03T14:42:04+5:30

शिवसेनेने बुधवारी तुकाराम चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

The 'Rasta Roko' movement was done by Shivsena in Tukaram Chowk | तुकाराम चौकात शिवसनेने केले ‘रास्ता रोको’ आंदोलन

तुकाराम चौकात शिवसनेने केले ‘रास्ता रोको’ आंदोलन

अकोला : शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असून, ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने बुधवारी तुकाराम चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या या रस्त्यावर तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, निवासी अंध विद्यालय, शासनाची विविध कार्यालये, वाणिज्य संकुल आहेत. सध्या या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे एकेरी वाहतुक सुरु आहे. हे काम अत्यंत धिम्या गतीने होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने व उत्तम दर्जाचे करण्यात यावे, या मागणीसाठी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी स्टेट बँकेसमोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The 'Rasta Roko' movement was done by Shivsena in Tukaram Chowk