भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:27+5:302021-07-07T04:24:27+5:30
जिल्हा भाजप अध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर ...

भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन
जिल्हा भाजप अध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ९ ठिकाणी आंदोलन झाले. केवळ दुष्ट हेतूने १२ आमदारांची केलेली निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भाजप संघर्ष करतच राहील, असा इशारा याप्रसंगी बोलताना भाजपा महानगर अध्यक्ष अग्रवाल यांनी दिला. या आंदोलनात महापौर अर्चना मसने, राजेंद्र गिरी, माधव मानकर, अंबादास उमाळे, ॲड. देवाशिष काकड, वैशाली शेळके, विलास शेळके, संजय गोडा, संजय गोडफोडे, नीलेश नीनोरे, किशोर पाटील, संतोष पांडे, गणेश अंधारे, अमोल गोगे, चंदा शर्मा, सुनीता अग्रवाल, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, पवन पाडिया, राहुल देशमुख, निकिता देशमुख, मंगला शर्मा, सोनाल शर्मा, साधना ठाकरे, साधना येवले, अक्षय जोशी, अतुल अग्रवाल, मनीष बुंदिले, टोनी जयराज, भूषण इंडोरिया, मनोज साहू, हरिभाऊ काळे, बाळू सोनवणे, उकंडराव सोनवणे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी भाजयुमोने पुतळा दहन व भास्कर जाधव यांच्या प्रतिमेवर शाई फेकून निषेध व्यक्त केला.