बाश्रीटाकळी येथे रेशनचा ३ लाखांचा तांदूळ जप्त

By Admin | Updated: November 2, 2015 02:57 IST2015-11-02T02:57:42+5:302015-11-02T02:57:42+5:30

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई.

Rashna's rice worth Rs 3 lakh was seized at Bashritakali | बाश्रीटाकळी येथे रेशनचा ३ लाखांचा तांदूळ जप्त

बाश्रीटाकळी येथे रेशनचा ३ लाखांचा तांदूळ जप्त

बाश्रीटाकळी : येथील सोनगिरी झोपडपट्टीतील गोडाउनमध्ये अवैधरीत्या साठवलेला रेशनचा ३00 क्विंटल तांदूळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री जप्त केला. जप्त केलेल्या तांदळाची किंमत ३ लाख रुपये आहे. शनिवारी रात्री एम.एच ३0 - २७३२ या वाहनामध्ये रेशनचा तांदूळ अवैधरीत्या पातूरवरून बाश्रीटाकळीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रूचून वाहनाला पकडले. त्यानंतर पोलिसांनी तांदूळ साठविण्यात येणार्‍या गोदामावर धाव घेतली. पोलिसांनी गोदामाची पाहणी केली. पोलिसांनी ३00 क्विंटल रेशनचा तांदूळ (किंमत ३ लाख रुपये), पिकअप व्हॅन ( किंमत २ लाख ५0 हजार ३00), बारदानासह (किंमत ३ हजार २00 रुपये) एकूण ५ लाख ५ हजार ५00 रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी तनवीर अन्सारी एजाज अन्सारी (२१), सै. समीर सै. जफर (२३), शे. नासीर शे. नजीम (२0), सर्व राहणार पातूर यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याचे कलम ३, ७ नुसार बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rashna's rice worth Rs 3 lakh was seized at Bashritakali