दुर्मीळ घोरपडची खुलेआम कत्तल

By Admin | Updated: July 30, 2014 01:11 IST2014-07-30T01:11:14+5:302014-07-30T01:11:14+5:30

विशिष्ट भागात शिकारींचे जाळे; वन विभाग झोपेत

Rarely open slaughterhouse | दुर्मीळ घोरपडची खुलेआम कत्तल

दुर्मीळ घोरपडची खुलेआम कत्तल

अकोला: लोकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी दुर्मीळ वन्यजीव, घोरपडची जिल्ह्यात खुलेआम कत्तल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळय़ाच्या सुरूवातीस हा गोरखधंदा तेजीत चालतो. जिल्ह्याच्या विविध भागात घोरपडची सर्रास कत्तल होत असताना वन्यजीव विभाग, वन विभाग व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधुन उघडकीस आले आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जमिनीखाली दडून बसलेली घोरपड जमिनीवर येते. घोरपड खाल्ल्यास सांधेदुखी, हाडांचे विकार नष्ट होतात, असा समज आहे. शास्त्रीयदृष्ट्या याला कोणताही आधार नाही, हे विशेष; परंतु अपप्रचार व अंधश्रद्धेपोटी दरवर्षी हजारो घोरपडींची कत्तल केली जाते. जिभेचे चोचले पुरविणार्‍यांची वाढती संख्या आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची लोकांची मानसिकता, यामुळे दुर्गम भागातील विशिष्ट जमातीला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यातील बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा तालुक्यातील दुर्गम भागासह अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या शिसा-मासा शिवारात घोरपडची सर्रास कत्तल करून विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. पातूर ते मालेगाव मार्गावरील काही विशिष्ट धाब्यांवरही घोरपडचे मांस मिळत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. प्रती किलो ५00 ते ६00 रुपये दराने घोरपडचे मांस विकले जात असून, अंधश्रद्धपोटी ग्राहक किंमत मोजण्यास तयार आहेत. दुर्मीळ वन्यजीवाची खुलेआम कत्तल होत असताना वन्यजीव विभाग, वन विभागासह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Rarely open slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.