सिंचन विहिरींच्या कामावर कार्यासन अधिका-यांचा तीव्र संताप

By Admin | Updated: April 30, 2015 01:55 IST2015-04-30T01:55:40+5:302015-04-30T01:55:40+5:30

अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात ४७ विहिरींची कामे अद्याप सुरूच झाली नसल्याचे स्पष्ट.

Rapid anger of the officials of the irrigation wells | सिंचन विहिरींच्या कामावर कार्यासन अधिका-यांचा तीव्र संताप

सिंचन विहिरींच्या कामावर कार्यासन अधिका-यांचा तीव्र संताप

संतोष येलकर /अकोला: धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यातील विहिरींच्या अपूर्ण कामांची तपासणी शासनाच्या रोहयो व नियोजन विभागाचे कार्यासन अधिकारी संदीप खांडके यांनी मंगळवारी केली. या तपासणीत अकोला व मूर्तिजापूर या दोन तालुक्यात ४७ विहिरींची कामे सुरूच करण्यात आली नसल्याच्या मुद्यावर कार्यासन अधिकार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३२९ सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांपैकी १७१ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली असून, १0७ विहिरींची कामे सुरू आहेत, तर उर्वरित ४३ कामे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत. मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या रोहयो व नियोजन विभागाचे कार्यासन अधिकारी संदीप खांडके यांनी मंगळवार, बुधवार या दोन दिवसात जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांची तपासणी केली. त्यामध्ये मंगळवारी अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात केलेल्या तपासणीत मूर्तिजापूर तालुक्यात २६ आणि अकोला तालुक्या त १७, अशी एकूण ४३ सिंचन विहिरींची कामे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे आढळून आले. या मुद्यावर कार्यासन अधिकार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त करीत, सिंचन विहिरींची ही अपूर्ण कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. वारंवार निर्देश देऊनही सिंचन विहिरींची अपूर्ण कामे सुरू करण्यात आली नसल्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनीही संताप व्यक्त केला.

Web Title: Rapid anger of the officials of the irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.