बलात्कार करणारा युवक वर्षभरापासून फरार

By Admin | Updated: March 10, 2017 02:34 IST2017-03-10T02:34:22+5:302017-03-10T02:34:22+5:30

एका आरोपीस अटक; मात्र दुसरा आरोपी युवक वर्षभरापासून फरार आहे

The rape victim escapes from a year | बलात्कार करणारा युवक वर्षभरापासून फरार

बलात्कार करणारा युवक वर्षभरापासून फरार

अकोला, दि. ९- सिंदखेड मोरेश्‍वर शिवारातील शेतामध्ये दोघा युवकांनी पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली; परंतु दुसरा आरोपी युवक हा वर्षभरापासून फरार आहे. वर्ष उलटून गेल्यानंतरही बाश्रीटाकळी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पावले उचलली नाही. बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्‍वर शिवारातील एका शेतामध्ये धारणी येथील एक आदिवासी कुटुंब राखणदारीचे काम करते. २८ फेब्रुवारी २0१६ रोजी पीडित महिला व तिचा पती मुलांसह शेतातील घरात झोपी गेले असता, राजंदा येथील आरोपी शंकर ऊर्फ शेखर देवराव मुंडे (२४) आणि त्याचा सहकारी आशिष ऊर्फ हुश्या श्रीकृष्ण कानपुरे (२८) हे शेतात आले. त्यांनी पतीच्या गळय़ाला धारदार चाकू लावला आणि दोघाही आरोपींनी आळीपाळीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपी पतीकडील मोबाइल हिसकावून पळून गेले. महिलेच्या तक्रारीनुसार बाश्रीटाकळी पोलिसांनी दोघाही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६(ड), ३९२, ४४७(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शंकर मुंडे यास अटक केली. ८ मार्च २0१६ पासून शंकर मुंडे हा कारागृहात आहे; परंतु त्याचा सोबती आशिष कानपुरे हा वर्षभरापासून फरार आहे.

Web Title: The rape victim escapes from a year