सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: September 22, 2014 01:26 IST2014-09-21T22:59:09+5:302014-09-22T01:26:21+5:30

अकोला येथील घटना; वासनांध सावत्र बापास अटक.

Rape of step-father's daughter | सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

अकोला: सावत्र बापाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.
पीडित मुलगी शनिवारी रात्री घरी एकटी असताना, आरोपी किशोर श्यामराव ढाळे (३0 , रा. एमराल्ड कॉलनी) घरात आला. त्याने मुलीला हातपाय चेपण्यास सांगितले. दरम्यान, त्याने धमकी देऊन, ितच्यावर बलात्कार केला. सकाळी मुलीची आई घरी परतल्यावर, तिने घडलेला प्रसंग सांगितला. मुलगी व तिच्या आईने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात सावत्र बापाविरूद्ध तक्रार दिली. किशोर श्यामराव ढाळे हा ऑटोचालक असून, काही वर्षांपूर्वी त्याने पीडित मुलीच्या आईसोबत विवाह केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Rape of step-father's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.