रा.प. महामंडळ उठले प्रवाशांच्या जिवावर!

By Admin | Updated: September 5, 2015 01:47 IST2015-09-05T01:47:19+5:302015-09-05T01:47:19+5:30

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात फुटले नादुरुस मिडीबससचे टायर.

Ra.p. Mahamandal Rival passengers killed! | रा.प. महामंडळ उठले प्रवाशांच्या जिवावर!

रा.प. महामंडळ उठले प्रवाशांच्या जिवावर!

अकोला : बसचे झिजलेले टायर व उद्भवलेल्या यांत्रिक बिघाडांची यादी ह्यलॉगशिटह्णच्या माध्यमातून मिळाल्यानंतरदेखील, यांत्रिक पर्यवेक्षकाने 'ओके' म्हणून परत पाठविलेल्या मिडीबसचे समोरील टायर शुक्रवारी दुपारी १२.३0 च्या सुमारास मध्यवर्ती बससस्थानकाच्या निकासी प्रवेशद्वाराजवळ फुटले. केंद्राधिकार्‍यांची परवानगी नसतानादेखील आगार क्रमांक २ मध्ये दोन सहायक कार्यशाळा अधीक्षक कार्यरत आहेत. असे असतानादेखील आगारातील नादुरुस्त गाड्या रस्त्यांवर धावत असल्याने राज्य परिवहन महामंडळ चालक-वाहकांच्याच नव्हे, तर प्रवाशांच्यादेखील जिवावर उठले असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य परिवह महामंडळाच्या अकोला विभागात आजपर्यंंत आपण कालबाहय़ आणि नादुरुस्त झालेल्या बसेस धावता धावता बंद पडल्याच्या अनेक घटना एकल्या वा अनुभवल्या असतील; मात्र आता या नादुरुस्त बसेस विभागातील चालक, वाहक आणि प्रवाशांसाठी धोकादायक सिद्ध ठरू लागल्या आहेत. याची प्रचिती शुक्रवारी आगार क्रमांक २ च्या एमएच 0७ सी ७७९४ या मिडीबसमध्ये बसलेल्या प्रवाशांना आणि चालक-वाहाकांना आली. सकाळी अकोला-शेगाव-अकोला ही फेरी मारल्यानंतर ९.३0 वाजता अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचल्यानंतर चालक एस.बी. लोखंडे व वाहक सुधीर महाजन यांनी ह्यलॉकशिटह्णच्या माध्यमातून यांत्रिक पर्यवेक्षक मोरे यांच्याकडे चालकच्या भागाकडील समोरचे टायर झिजले असल्याची व इतर तांत्रिक बिघाडांची यादी दिली; मात्र थातूरमातूर पाहणी करून त्यांनी ह्यओकेह्णचा शेरा देत ती मिडीबस परत चालकाकडे पाठविली. दुपारी १२.३0 च्या सुमारास ३५ प्रवासी घेऊन शेगावकडे निघालेल्या या मिडीबसचे चालक भागाकडील समोरील झिजलेले टायर फुटले. यावेळी जमलेल्या चालक-वाहकांनी लेखी तक्रार दिल्यानंतर देखील दुरुस्तीचा शेरा मारणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात निदर्शने केली. नादुरुस्त बसदेखील जागची हालत नसल्याने स्थानकातून बाहेर पडणार्‍या इतर बसचालकांना कसरत करावी लागली. माहिती मिळताच विभागीय कार्यशाळेचे मुख्य यंत्र अभियंता रामटेके व विभागीय वाहतूक अधिकारी क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: Ra.p. Mahamandal Rival passengers killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.