रानडुकरांच्या हैदोसाने केळीची बाग उद्ध्वस्त

By Admin | Updated: April 4, 2016 02:19 IST2016-04-04T02:19:33+5:302016-04-04T02:19:33+5:30

अकोला जिल्ह्यातील मळसूर येथील घटना; ३00 झाडे जमीनदोस्त.

Randukar's Haidos destroyed the banana garden | रानडुकरांच्या हैदोसाने केळीची बाग उद्ध्वस्त

रानडुकरांच्या हैदोसाने केळीची बाग उद्ध्वस्त

मळसूर (जि. अकोला): रानडुकरांनी रात्रभर हैदोस घातल्याने येथील एका शेतकर्‍याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे सदर शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील विनोद शालीग्राम राऊत यांच्या एक हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागेत रानडुकरांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रात्रभर हैदोस घातल्याने केळीची जवळपास ३00 झाडे जमीनदोस्त झाली. यामुळे त्यांचे अंदाजे ६0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच, तलाठी यांनी नुकसानाची पाहणी केली. आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मळसूर शिवारात रानडुकरांच्या टोळय़ा आहेत. यापूर्वीही राऊत यांच्या शेतातील पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विनोद राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Randukar's Haidos destroyed the banana garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.