रामनवमी शोभायात्रा रद्द; मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST2021-04-20T04:19:30+5:302021-04-20T04:19:30+5:30
२१ एप्रिलला प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजेच रामनवमी उत्सव दरवर्षी महाराष्ट्रीयन हिंदी भाषिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने ...

रामनवमी शोभायात्रा रद्द; मास्कचे वितरण
२१ एप्रिलला प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजेच रामनवमी उत्सव दरवर्षी महाराष्ट्रीयन हिंदी भाषिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. पण, यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रीयन हिंदी भाषिक संस्थेच्या वतीने यावर्षी २१ एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती संस्थाध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे. त्याऐवजी सामाजिक कार्याचा सलोखा जोपासत यावर्षी कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूर्तिजापूर शहरातील नागरिकांना मास्कचे वितरण २० एप्रिलला मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता मोरारजी चौक येथे वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.