लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

By Admin | Updated: July 13, 2014 00:57 IST2014-07-13T00:57:51+5:302014-07-13T00:57:51+5:30

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहरात रॅली काढण्यात आली.

Rally on population day | लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

अकोला : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहरात रॅली काढण्यात आली. शासनामार्फत राबविल्या जाणार्‍या कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करून, त्याद्वारे कुटुंब र्मयादित ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी केले. मातृत्व सुरक्षा दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने आणि जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सहकार्याने काढण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद आवारातून करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन अंबाडेकर व इतरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.देशाची वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय बनत चालला असून, वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असेही जिल्हा परिषद अध्यक्ष गवई यांनी यावेळी सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी विचार मांडले. तहसील कार्यालय समोरून, गांधी रोड, बसस्थानक, टॉवर चौक मार्गे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जागतिक लोकसंख्या दिन आणि सुरक्षित मातृत्व दिनाचे महत्त्व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अंबाडेकर यांनी पटवून दिले. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांजवळील जनजागृतीपर संदेशांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीत विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नर्सिंंग महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रकाश गवळी यांनी केले.

Web Title: Rally on population day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.