शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राजनापूर खिनखिनीची पाणीदार गावाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी ...

मूर्तिजापूर : भारतीय जैन संघटनेच्या वतीने तालुक्यात गतवर्षीपासून जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील तालुक्यातील राजनापूर खिनखिनी गावात नाला रुंदीकरणाचे काम सुरू असून, जलसंधारणाचे काम भविष्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. याकामी जिल्ह्यात जेसीबी मशीन अविरत काम करीत आहेत.

जलसंधारणाच्या कामामुळे या गावची पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय जैन संघटना ही एक सामाजिक संघटना आहे. आपत्ती व्यवस्थापन व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीसमयी सर्वात प्रथम मदतीला धावून येते. बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या नि:स्वार्थ मार्गदर्शनाखाली बीजेएसचा चमू संपूर्ण भारतातील सामाजिक जाणिवेतून आपली जबाबदारी पार पाडत आहे. लाॅकडाऊन काळातही सर्व नियमांचे पालन करून अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे धडाक्याने सुरू आहेत. ‘सुजलाम् सुफलाम्’ अकोला प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर विविध जलसंधारणाची कामे करण्याकरिता ग्रामपंचायत जलसंधारण मॉडेलअंतर्गत जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती बीडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेल्या राजनापूर खिनखिनी येथे नाला रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

फोटो:

४० ग्रामपंचायत अंतर्गत जलसंधारणाची कामे

या माध्यमातून जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ४० ग्रामपंचायतींमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, जलशोषक पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे अशी विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचाही जमिनीची पोत राखण्यास मदत झाली.

तीन लाख घनमीटर गाळ व मातीचा उपसा

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखांच्या वर घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला आहे. शेततळ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सगळ्यात मोठे काम मूर्तिजापूर तालुक्यात झालेले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यासाठी दहा जेसीबी मशीन उपलब्ध असून, आठ मशीन अविरत कामात गुंतल्या आहेत. तालुक्यातील किनी फणी येथेही मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत, तर मधापुरी गावात शेततळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली असून, येथील शेततळे मॉडेल ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे तळे आता पाण्याने तुडुंब भरले असते तर तालुक्यात खापरावाडा, माना, मधापुरी, जितापूर (खेडकर), कंझरा, राजनापूर खिनखिनी येथेसुद्धा पालकमंत्री जलशोषण निर्मित पाणंद रस्ते यासारखी कामे करण्यात आली आहेत.

पिकाचे नुकसानही होणार नाही, भूजल पातळीही वाढेल

भारतीय जैन संघटनेच्या तत्त्वानुसार ‘मशीन आमची, डिझेल तुमचे’ शेतकऱ्यांच्या शेतावरचे बांध दुरुस्ती, नाला दुरुस्ती ही सर्व कामे अवघ्या अर्ध्या खर्चाच्या आतच झाली असून, शेतकऱ्यांचा आर्थिक भुर्दंड ५० टक्क्याने कमी झाला आहे. याच पद्धतीने नाल्याचे खोलीकरण सुरू असून, आतापर्यंत चार किलोमीटर काम पूर्णत्वास गेले आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरणार नसल्याने पिकांचे नुकसानही होणार नाही व भूजलपातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

..यांची मोलाची मदत

या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख तथा जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांच्यासह तालुकाध्यक्ष डॉ. सुजित बन्नोरे, तालुका सचिव नीलेश महाजन यांची या कामासाठी मोठी मदत झाली. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने केवळ १० जूनपर्यंत कामे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’

‘डिझेल तुमचे, मशीन आमची’ या तत्त्वावर जलसंधारणाची कामे चालू आहेत. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतने ग्रामसभेत कामाचा ठराव मंजूर करून बीजेएसच्या जिल्हाध्यक्षाकडे तशी मागणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात येते.

-डॉ. सुजित बन्नोरे

तालुका अध्यक्ष, भारतीय जैन संघटना

गावात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल व गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. पालकमंत्री बच्चू कडू व बीजेएस यांच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्याचा मानस आहे. त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- प्रगती रुपेश कडू

सरपंच, राजनापूर खिनखिनी

माझ्या शेतात सातत्याने नाल्याच्या पुराचे पाणी शिरून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. नाल्याचे २२ फूट खोलीकरण करण्यात आल्याने आता पिकांचे नुकसान हाेण्याचा धोका नाही. या कामामुळे नाल्या काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

-सनी देशमुख,

शेतकरी राजनापूर खिनखिनी