शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गुटखा विक्री केंद्रावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:06 IST

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना, त्यांनी निमवाडीतील लक्झरी बसस्टँडजवळील एका गुटखा विक्री केंद्रावर अचानक छापा घातला

अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना, त्यांनी निमवाडीतील लक्झरी बसस्टँडजवळील एका गुटखा विक्री केंद्रावर अचानक छापा घातला. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्री केंद्रावरून गुटख्याचा साठा जप्त केला आणि त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अकोला येथे सहकार नेते वसंतराव धोत्रे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येत असताना, त्यांनी अचानक त्यांचा ताफा निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्टँडजवळ थांबविला आणि तेथील मे. जामनिक कोल्ड्रिंक्स नामक पान टपरीवर जाऊन गुटखा मिळतो का, याबाबत चौकशी केली.चौकशीदरम्यान प्रतिबंधित गुटखा मिळत असल्याचे त्यांना कळल्यावर, त्यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांसह पोलिसांना पानटपरीची झडती घेण्याचे निर्देश दिले. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलिसांनी पानटपरीची झडती घेतली.झडतीदरम्यान विविध कंपन्यांचा पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा, सुपारी आढळून आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पानटपरीवरील अंदाजे ५ हजार रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला. गुटखा विक्रेता सुरेंद्र रामराव जामनिक (३१) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेAkolaअकोला