पावसाचा दिवस

By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:41:04+5:302014-08-31T23:53:09+5:30

गत दोन दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस : सरासरी २१.९८ टक्के पावसाची नोंद.

Rainy Day | पावसाचा दिवस

पावसाचा दिवस

बुलडाणा : ऑगस्टमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या सामाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी वाढली आहे. गत दोन दिवसापासून बुलडाणासह चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर, मोताळा, लोणार, शेगाव, खामगाव, जळगाव जा. तालुक्यात दमदार पाऊस सुरु आहे. या पावसाच्या दिवसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय पिकांनाही नविन जिवदान मिळाले आहे.
जिल्ह्यात महिनाभरापासुन दडी मारलेल्या पावसाने २३ जुलैपासुन आगमन झाले. २५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंंंत नोंदविला पाऊस हा ४१ टक्के ऐवढा होता. मात्र २८ ऑगस्टपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला तो ३१ ऑगस्टपर्यत कायम आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाची एकूण सरासरी २१.९८ ऐवढी नोंदवीला केली. तर आजपर्यत एकूण पाऊस ३२७.0७ मी.मी असून त्याची सरासरी ३८३ एवढी नोंदविली गेली आहे.
यंदाच्या पावसाने उशीरा हजेरी लावल्याने लाखो हेक्टरवरील खरीप पेरण्या लांबल्या होत्या. शेतकरीही चिंताग्रस्त झाला होता. या पेरण्या कशाबशा पुर्ण झाल्यावर जुलै महिन्यात व ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दिर्घकाळ उघडीप दिली. यामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवाड्यात सुरु झालेल्या व अजूनही सुरु असलेल्या नियमित पावसाने पिकांना पुन्हा जिवदान मिळाले आहे. मात्र गत वर्षी ऑगस्टमध्ये सरासरी ९९0६.३७ एवढा पाऊस पडला होता. मात्रया तुलनेत व वार्षिक सरासरी पर्जन्यमान लक्षात घेतले तर आज ३१ ऑगस्ट अखेरपर्यत सरासरी ३२७.0७ एवढाचा पाऊस पडला आहे. हा पाऊस जिल्ह्यासाठी अपुराच असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
*मोताळा तालुक्यात पाऊस; जनजीवन विस्कळीत
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, पिंपळगाव देवी, शेलापूर, पिंप्रीगवळी, रोहिणखेड, बोराखेडी व कोथळीसह तरोडा, कुर्‍हा-गोतमारा, लिहा परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कापूस,सोयाबीन, मका व कडधान्यांना जीवदान मिळणार असून, मोताळा-बोराखेडी परिसरातील नदय़ांना या पावसाळय़ात पहिल्यांदाच पूर आला आहे. त्यामुळे बोराखेडी व मोताळा परिसरातील नदय़ा दुथडी भरून वाहत आहेत. मागील आठवड्यापासून तालुक्यात पावसाने सुरूवात केली. गेल्या २४ तासात १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंंत ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Rainy Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.