पाच तालुक्यात बरसला पाऊस
By Admin | Updated: September 8, 2015 02:23 IST2015-09-08T02:23:28+5:302015-09-08T02:23:28+5:30
अकोला जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा.

पाच तालुक्यात बरसला पाऊस
अकोला: जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर आणि तेल्हारा या पाच तालुक्यात सोमवारी सायंकाळी दमदार पाऊस बरसला; मात्र पिकांसह जलसाठय़ात वाढ होण्यासाठी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पावसाअभावी पिके संकटात आल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अकोला शहर आणि तालुक्यात, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा या पाच तालुक्यात दमदार पाऊस बरसला. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरला असला तरी, जिल्ह्यातील आकोट, बाश्रीटाकळी या दोन तालुक्यात मात्र पावसाने हजेरी लावली नाही. दरम्यान, रविवारी रात्री तेल्हारा तालुक्यात पाऊस झाला. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांसह धरणांमधील जलसाठय़ात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्यांसह नागरिकांकडून केली जात आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने अकोला शहरात सुद्धा हजेरी लावली. पावसामूळे गारवा निर्माण झाला होता. दिवसभरापासून प्रखर उन्हापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला. कावडयात्रेदरम्यान आलेल्या पावसामूळे भाविकांची एकच धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आसरा शोधला.