विजेच्या कडकडाटासह अकोल्यात अवकाळी पाऊस !
By Admin | Updated: May 7, 2016 01:33 IST2016-05-07T01:33:50+5:302016-05-07T01:33:50+5:30
अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा.

विजेच्या कडकडाटासह अकोल्यात अवकाळी पाऊस !
अकोला : दिवसभर कडक उन तापल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अकोल्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटून, विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर दिसून आला. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. गत दोन दिवसापासून जिल्हयात ढगाळ वातावरण होते. गुरू वारी शहरासह जिल्हयात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर उन तापल्यानंतर सांयकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास २0 ते २५ मिनीटं पडलेल्या पावसाने अकोलेकरांची दाणादाण केली. लघू व्यावसायिंकाचीही त्रेधातिरपट उडाली. अनेकांनी मिळेल तिथे सहारा घेऊन, पावसापासून बचाव केला. शहरातील मुख्य रस्त्यांचे काम सुरू असल्याने, या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले. परिणामी वाहनधारकांना खड्डयातून रस्ता शोधताना कसरत करावी लागली. अनेक भागातील वीजपुरवठा बराच वेळ खंडित होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गत काही दिवसांपासून ४४ ते ४५ अंश तापमान सोसणार्या अकोलेकरांना यामुळे हायसे वाटले.