पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस !

By Admin | Updated: July 20, 2015 23:10 IST2015-07-20T23:10:52+5:302015-07-20T23:10:52+5:30

पश्‍चिम विदर्भात चिखलदरा, धारणी व आकोटला पावसाची नोंद.

Rain in many places in eastern Vidarbha! | पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस !

पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस !

अकोला : दोन दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली असून, मागील चोवीस तासात विदर्भातील पेरसेओणी, घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव व मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक ९ सेमी पावसाची नोंद झाली आहे. पश्‍चिम विदर्भातील चिखलदरा येथे ५ सेमी, आकोटला २ व धारणी येथे केवळ १ सेमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्हय़ात रिमझिम पाऊस बरसला. येत्या २४ जुलैपर्यंंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या मध्यप्रदेशच्या उत्तर आणि उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. गेल्या चोवीस तासात कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात मध्यम ते हलक्या स्वरू पाचा पाऊस पडला आहे. विदर्भात पेरसेओणी येथे ९ सेमी, रामटेक, सावनेर ६, चिखलदरा ५, सडकअर्जुनी ४, देसाईगंज, मोहाडीफाटा, गडचिरोली, सालेकसा, चार्मोशी, ब्रह्मपुरी, आमगाव व तुमसर येथे ३ सेमी, पौनी, काटोल, गोरेगाव, सिरोंचा, आरमोरी, अर्जुनी मोरगाव, नरखेड, मूल, भद्रावती, कुरखेडा, आकोट, धानोरा, पोम्भुर्ण येथे २ सेमी, कुही, धारणी, कामठी, वरोरा, एटापल्ली, सावळी, नागभिर, कोची, चंद्रपूर, देवरी, मौदा, वरुड मुलचेरा व भंडारा येथे केवळ १ सेमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या २१ ते २४ जुलैपर्यंंंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, कोकणात २२ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार व २३ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २१ ते २६ जुलैपर्यंंंत पुणे व परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरात २१ व २२ जुलै रोजी अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title: Rain in many places in eastern Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.