शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काढणी हंगामातच पावसाचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:12 IST

जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऐन खरीप हंगामातील पीक काढणीच्या हंगामातच पावसाने दणका दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, सणासुदीच्या दिवसांत पश्चिम विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जवळपास आताच ४० टक्क्यांच्यावर उत्पादन घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गत आठ ते दहा दिवसांपासून पश्चिम विदर्भात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात कपाशीचे पीकही फुलले आहे; परंतु सारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेले सोयाबीन शेतातच सडले असून, त्याला कोंब फुटले आहेत.ज्वारी, कपाशीची बोंडे काळी पडली आहेत. कपाशी परिपक्क होण्याअगोदरच बोंडांमधून कपाशी बाहेर आली. पावसामुळे पपई, लिंबू, संत्रा फळपिकाला फटका बसला असून, पपई आणि लिंबू पिकाची फळगळ झाली आहे.अंबिया बहारातील संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच सतत दीड महिना पाऊस सुरू राहिल्याने पिकांची वाढ खुंटली.कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कीड, रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वारंवार फवारणीचा खर्च करावा लागला. मूग, उडीद अगोदरच हातचा गेल्याने सर्व भिस्त कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांवर आहे; परंतु ऐन काढणीच्या वेळेसच सतत दहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने सणासुदीच्या दिवसांत शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला कोंब फुटले! सोयाबीन परिपक्च झाल्यानंतर सतत आठ ते दहा दिवस पाऊस राहिल्यास सोयाबीनला कोंब फुटतातच. तोच प्रत्यय शेतकºयांना येत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढून शेतातच ठेवण्यात आले आहे. पावसामुळे शेतात जाता येत नसल्याने सोयाबीनला कोंब फुटले असून, प्रत खराब झाली आहे.

दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हे घडले आहे. कपाशी पिवळी पडली आहे. या वातावरणाचा तूर पिकावरही कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काढणीला आलेल्या पिकाचे संरक्षण करावे.- डॉ. दिलीप मानकर, संचालक, विस्तार, शिक्षण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस