रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पाऊस!
By Admin | Updated: May 26, 2017 03:04 IST2017-05-26T03:04:12+5:302017-05-26T03:04:12+5:30
समाधानकारक पावसाचे संकेत; आजपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ

रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पाऊस!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येला अकोला शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पावसाचे हे संकेत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये मानले जात आहे. शुक्रवार, २६ मेपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होत आहे.
रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येवर अकोला व परिसरात ढगाळ वातावरण निर्मिती होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखद संदेश घेऊन आल्याची चर्चा शहरानजीकच्या शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरम्यान, परंपरेनुसार आजपर्यंत शेतकरी या नक्षत्रानुसार शेतीचे नियोजन करीत असतो. त्यानुसार रोहिणी नक्षत्र शुक्रवार, २६ मे रोजी सकाळी ०५:४४ ला सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. या नक्षत्रात आकाश ढगाळ राहील व उन्हाळा वाढण्याची शक्यता आहे. ८ मे रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होईल. या नक्षत्राचे वाहन हे मेंढा आहे. २१ मे रोजी आर्द्रा नक्षत्र लागणार असून, या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याचे सांगितले जात आहे. ५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्रास सुरुवात होणार असून, या नक्षत्राचे वाहन हे कोल्हा आहे. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्र लागणार आहे, त्याचे वाहन उंदीर असून, २ आॅगस्ट रोजी आश्लेष नक्षत्र लागेल. त्याचे वाहन घोडा आहे. १६ आॅगस्ट रोजी मघा नक्षत्रास सुरुवात होणार आहे.
३० रोजी पूर्वा नक्षत्र वाहन - गाढव, १३ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्र वाहन - बेडूक, २६ सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्र वाहन -उंदीर, १० आॅक्टोबर रोजी चित्रा नक्षत्र वाहन - घोडा, तर २३ आॅक्टोबर रोजी स्वाती नक्षत्र वाहन लागणार आहे.