रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:47 IST2018-05-04T16:47:28+5:302018-05-04T16:47:28+5:30

अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

railway wendor raped a young woman | रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष देऊन युवतीवर बलात्कार

ठळक मुद्देएका वेंडरने एका युवतीला रेल्वेत उद्घोषक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूलथापा दिल्या.मामाच्या निवासस्थानी आणि शेगाव येथे नेऊनसुद्धा अत्याचार करण्यात आल्याची माहिती युवतीने पोलिसांना सांगितली. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.


अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या युवतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे ही तक्रार दिली असून, पोलीस अधीक्षकांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
रेल्वे स्थानकावर बिसलरी व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका वेंडरने एका युवतीला रेल्वेत उद्घोषक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूलथापा दिल्या. त्यानंतर वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. तुझा आवाज चांगला असल्याने तुला उद्घोषक म्हणून लावून देतो, असे म्हणून त्याने युवतीचे वारंवार लैंगिक शोषण केले. मामाच्या निवासस्थानी आणि शेगाव येथे नेऊनसुद्धा अत्याचार करण्यात आल्याची माहिती युवतीने पोलिसांना सांगितली. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने, युवतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. लैंगिक शोषण झाल्यानंतर युवतीने नोकरीसाठी वारंवार पाठपुरावा केला असता, या वेंडरने तिला नोकरी दिली नाही. तसेच तिची टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी युवतीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
 
पीडितेवरच दबाव आणण्याचा प्रयत्न
या प्रकरणातील आरोपीने त्याच्या पत्नीला समोर करून पीडितेची पोलिसात तक्रार करून, तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या पत्नीने युवतीवर दबाव आणण्यासाठी तिच्याविरोधात तक्रार करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

 

Web Title: railway wendor raped a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.