‘रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली’ नव्या वास्तूमध्ये कार्यान्वित

By Admin | Updated: January 15, 2015 00:37 IST2015-01-15T00:37:24+5:302015-01-15T00:37:24+5:30

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक करणार पाहणी.

'Railway reservation ticket system' implemented in new building | ‘रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली’ नव्या वास्तूमध्ये कार्यान्वित

‘रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली’ नव्या वास्तूमध्ये कार्यान्वित

अकोला : अकोला रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वास्तूमध्ये बुधवार, १४ जानेवारी रोजी रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.
पूर्वी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सामान्य आणि रेल्वे आरक्षण तिकीट खिडक्या अपुर्‍या पडत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वास्तूमध्ये ह्यआरक्षण तिकीट प्रणालीह्ण स्थानांतरित करण्यात आली. बुधवारी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या वास्तूमध्ये चार आरक्षण आणि एक चौकशी खिडकी निर्माण करण्यात आले असून, आरक्षण करणार्‍या अंध आणि अपंगां विशेष रॅम्पची सुविधा करण्यात आली
आहे.

*रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटले
अकोला रेल्वे स्थानकाचे रूप सध्या पालटलेले दिसून येत आहे. महाप्रबंधकांच्या आगमनानिमित्त रेल्वे स्थानकाचे सर्व प्लॅटफार्म व परिसर स्वच्छ करण्यात आला असून, नियमित ये-जा करणार्‍या नागरिकांना अकोला रेल्वे स्थानकाचे पालटलेले रूपडे पाहून आश्‍चर्याचा धक्का बसत आहे.

*पार्किंग व्यवस्था ढेपाळलेलीच; रेल्वेला लाखोचे नुकसान
रेल्वे प्रशासनाने येथील दुचाकी वाहनतळाच्या कंत्राटाची २0 टक्के रक्कम कमी करून चौथ्यांदा निविदा काढली. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाला कंत्राटदार गवसलेला नाही. गेल्या दिड वर्षांपासून कायम असलेल्या या स्थितीमुळे रेल्वेला लाखोचे नुकसान झाले आहे. ढेपाळलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे याठिकाणी स्पेअरपार्ट व दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नो पार्किंग झोनमध्ये दुचाक्या उभ्या करणार्‍यांवर महिन्याभरापूर्वी कारवाई करणारे रेल्वे पोलीसदेखील या भागात फिरकेनासे झाले आहेत.

Web Title: 'Railway reservation ticket system' implemented in new building