आरटीपीसीआर चाचणीमुळे टाळला जाताेय रेल्वेचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:05+5:302021-04-21T04:19:05+5:30
लाॅकडाऊनच्या शंकेचाही परिणाम अकाेला : कोरोना संसर्गाची तिसरी....................................... लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे परराज्यात ...

आरटीपीसीआर चाचणीमुळे टाळला जाताेय रेल्वेचा प्रवास
लाॅकडाऊनच्या शंकेचाही परिणाम
अकाेला : कोरोना संसर्गाची तिसरी....................................... लाट आली असून, देशभरात लॉकडाऊन होण्याचे चिन्हे आहेत. दुसरीकडे परराज्यात प्रवेश करायचा असेल तर ७२ तासाच्या आतील काेराेना चाचणीचा अहवाल साेबत बाळगावा लागताे त्यामुळे
रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी आरक्षण तिकीट रद्द करण्यास वेग आला आहे. अकाेला रेल्वेस्थानकावरून गत तीन दिवसांपासून दरदिवशी १२५ ते १५० आरक्षण रद्द करण्यात येत आहे. जवळपास दीड लाख रुपये प्रवाशांना परतावा करावे लागत आहेत.
देशात कोरानाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, देशातील प्रमुख शहरांना कोरोनाने वेढले आहे. त्यामुळे याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर होत आहे. प्रवाशांनी उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता, दोन महिन्यांपूर्वीच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण करून ठेवले आहे. मात्र, कोरानाचा संसर्ग आणि मृत्यूसंख्या लक्षात घेता, अनेकांनी रेल्वेगाड्यांचे आरक्षण रद्द करण्याचे सत्र चालविले आहे. त्याअनुषंगाने अकाेला रेल्वेस्थानकावरून आरक्षण रद्द करण्यास वेग आला आहे. येथून बिहार, हरिद्धार, उत्तरप्रदेश, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, हावडा या मार्गे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण तिकीट रद्द करण्यात येत आहे.
विशेष रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी ओसरली
कोरोना संसर्गामुळे विशेष रेल्वेगाड्यांमध्ये एप्रिल महिन्यात अचानक गर्दी ओसरली आहे. मुंबई, पुणे मार्गावरील गाड्यांमध्येही आता आरक्षण सहजतेने मिळत आहे. पुणे, मुंबई येथे कडक लॉकडाऊनचा हा परिणाम मानला जात आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाला आरक्षण तिकीट रद्द होत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.