दारू अड्ड्यांवर छापे; २४ हजारांचा माल जप्त
By Admin | Updated: August 1, 2014 02:23 IST2014-08-01T01:48:41+5:302014-08-01T02:23:51+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोला तालुक्यात कारवाई : एकास अटक.

दारू अड्ड्यांवर छापे; २४ हजारांचा माल जप्त
पिंजर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवार, ३१ जुलै रोजी पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या धाकली, दोनद खुर्द आणि तामशी येथील गावठी दारू अड्डय़ांवर छापे मारून २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व एका आरो पीच्या मुसक्या आवळल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांनी गुरुवारी गोपनीय माहितीवरून बाश्रीटाकळी तालुक्यातील धाकली, दोनद खुर्द आणि तामशी येथील गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकले. यावेळी ८७५ लीटर मोहासडवा, ५४ डब्बे, १ सायकल व दारू काढण्याचे साहित्य, असा २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोनद खुर्द येथील बाबूलाल ओंकार काशीकर या इसमास अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ६५ (फ) नुसार गुन्हा दाखल केला तर धाकली ये थील बेवारस मुद्देमाल जप्त करण्यात आला व अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक आर.के. फुसे, प्रभारी अधीक्षक जी.एम. सिरसाम, दुय्यम निरीक्षक आर.जी. पाटणे, सहायक दुय्यम निरीक्षक पी.टी. धांडे, सिरसाट, गायकवाड, सोनोने आदींनी केली.