तीन गावांतील जुगार अड्ड्यांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:23+5:302021-04-29T04:14:23+5:30

अकोला : हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगाव, हिंगणी, दानापूर या तीन गावांतील वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ...

Raids on gambling dens in three villages | तीन गावांतील जुगार अड्ड्यांवर छापेमारी

तीन गावांतील जुगार अड्ड्यांवर छापेमारी

अकोला : हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगाव, हिंगणी, दानापूर या तीन गावांतील वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापाा टाकून अवैध देशी विदेशी दारू, जुगारावर छापेमारी करीत सुमारे ११ आरोपींना अटक केली आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अडगाव येथून अवैध दारूसाठा जप्त केला असून, त्यामध्ये २०० देशी दारूच्या बाटल्या आणि २० विदेशी दारूच्या बाटल्या असा नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपाल अवचार हा अवैध दारू विक्री करताना मिळून आल्याने त्याच्यावर ६५ ई नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

दुसरीकडे हिंगणी आणि दानापूर येथे अवैध वरली, मटका, जुगारावर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या जुगार अड्ड्यावरून साहेबराव प्रल्हाद सोनोने, सचिन मनोहर गावंडे, पंजाब प्रल्हाद सोनोने, अमोल भगवान सोनोने, देवकिसन मोतीराम सोळंके, संतोष किसन उमाळे, संजय सोनोने, सर्वजण राहणार हिंगणी, संजय श्रीकृष्ण उन्हाळे, राहुल किसन वाकोडे, विनायक सावरकर, विठ्ठल लेंडे, मनोहर मोरे, सर्व राहणार दानापूर या सर्वांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हिंगणी आणि दानापूर येथील जुगाराच्या कारवाईमध्ये नगदी आणि मोबाईल, इतर साहित्य असा जवळपास ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Raids on gambling dens in three villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.