तळेगाव पातुर्डा येथे वरळी मटक्यावर छापा; ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:16+5:302020-12-05T04:31:16+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता तळेगाव पातुर्डा येथील पानटपरीमागे मोकळ्या जागी सार्वजनिक ठिकाणी ...

Raid on Worli Matka at Talegaon Paturda; 83 thousand worth of property confiscated | तळेगाव पातुर्डा येथे वरळी मटक्यावर छापा; ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव पातुर्डा येथे वरळी मटक्यावर छापा; ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता तळेगाव पातुर्डा येथील पानटपरीमागे मोकळ्या जागी सार्वजनिक ठिकाणी तितली भोवऱ्यावर पैसे लावून खायवाडी करताना मिळून आले. आरोपींजवळून ५० हजार रुपयांची मोटारसायकल (क्र. एमएच ३० बीई २५८४), २६ हजारांचा मोबाइल व रोख रक्कम ७ हजार २३० रुपये असा ८३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत संशयित लक्ष्मण देवीदास ताथोड, नागेश मधुकर ताथेड, रा. शिवाजी चौक, तळेगाव पातुर्डा, गोपाल शालीकराम दाते, संतोष बन्सीधर बुटे, रा. हनुमान मंदिराजवळ, बाभूळगाव तळेगाव, संजय राजकुमार दामोदर, रा. भीमनगर हाता, शुभम गुलाबराव सपकाळ, रा. संपतनाथ मंदिराजवळ, तळेगाव पातुर्डा यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांविरुद्ध तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामेश्वर वाकोडे करीत आहेत.

Web Title: Raid on Worli Matka at Talegaon Paturda; 83 thousand worth of property confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.