गावठी दारू अड्ड्यावर छापा : तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:43+5:302021-04-21T04:18:43+5:30
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर नंदापूर शिवारातील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारू काढून त्याची अवैध विक्री केल्या जात ...

गावठी दारू अड्ड्यावर छापा : तिघांना अटक
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर नंदापूर शिवारातील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारू काढून त्याची अवैध विक्री केल्या जात असल्याची माहिती पिंजरचे ठाणेदार महादेवराव पडघान यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी सकाळी सापळा रचला. गणवेश आणि सरकारी गाडी न वापरता, त्यांनी नदीपात्राच्या दिशेने २ किमी पायी प्रवास करून गावठी दारूट्टीवर छापा घालून घटनास्थळावरून ४५ लिटर सडवा मोहा, ११ लिटर गावठी दारू, ३० डबे आदी साहित्यासह ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी बबन वाकपानजरे, प्रशांत खंडारे, अविनाश इंगळे, सर्व रा. पातूर नंदापूर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध कलम ६५(क)(ड)(फ) महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई पीएसआय करुणा माहुरे, मो. नासिर आदींनी केली.
फोटो :