मळसूर, आलेगाव येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:53 IST2021-02-20T04:53:48+5:302021-02-20T04:53:48+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत मळसूर व आलेगाव येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी दहशतवाद विरोधी पथकाने ...

मळसूर, आलेगाव येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत मळसूर व आलेगाव येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून दोन जणांना अटक केली. त्यांच्याजवळून गावठी दारू व दारू काढण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.
आलेगाव, मळसूर, येथील मोहा हातभट्टीवर गावठी दारू गळण्याचे काम सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून दहशत विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांनी धाड टाकून आरोपी भास्कर मुकुंदा तायडे यांच्या जवळून हातभट्टी गावठी दारू १० डब्बे मोहा सडवा व ४० लीटर मोहा दारू किंमत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच आरोपी सय्यद रोशन सय्यद बदरुद्दीन रा.आलेगाव याच्या घरझडतीमध्ये ५० लीटर मोहा दारू व इतर साहित्य असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघे विरुद्ध चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.