जऊळखेड येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:30+5:302021-05-12T04:18:30+5:30

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जऊळखेड येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या ...

Raid on a large gambling den at Jaulkhed | जऊळखेड येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

जऊळखेड येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जऊळखेड येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणावरून सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह दारूचा साठा, असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जऊळखेड येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून जऊळखेड येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून श्याम उत्तमराव इंदोरे, किशोर मनोहर काकडे, विजय भीमराव तराळे, पांडुरंग त्र्यंबक डोंगरे, मनोहर शेषराव इंडोरे व रामकृष्ण विजय बघाव (सर्व रा. जऊळखेड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सहा जणांकडे दारूचा साठाही आढळून आला आहे. याप्रकरणी या जुगारयांविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on a large gambling den at Jaulkhed