बाळापूर येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST2021-06-17T04:13:49+5:302021-06-17T04:13:49+5:30

अकोला : बाळापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळीपुरा परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या ...

Raid on a large gambling den at Balapur | बाळापूर येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा

बाळापूर येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा

अकोला : बाळापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळीपुरा परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून जुगार खेळणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माळीपुरा येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून विलास यादवराव चव्हाण (वय ५५), नागेश रामराव वानखेडे (३१), गणेश गजानन काळणे (३२), प्रकाश शामराव राऊत (४२) व श्रीकृष्ण रामभाऊ जगताप (६६, सर्व रा. व्याळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on a large gambling den at Balapur