पिंजर व पातूर नंदापूर येथील जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:17 IST2021-02-07T04:17:48+5:302021-02-07T04:17:48+5:30

अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजर व पातूर नंदापरू येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगारावर पाेलीस अधीक्षकांच्या विशेष ...

Raid on gambling at Pinjar and Pathur Nandapur | पिंजर व पातूर नंदापूर येथील जुगारावर धाड

पिंजर व पातूर नंदापूर येथील जुगारावर धाड

अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजर व पातूर नंदापरू येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगारावर पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी छापा टाकला. या ठिकाणावरून सहा जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून राेख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर नंदापूर येथे माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहीतीवरून त्यांच्या पथकाने शनिवारी जुगार अड्ड्यावर छापा टाकला व शेख सिराज शेख सबुद्धिन, मंगेश दुर्योधन इंगळे, अविनाश साहेबराव डवले, उमेष दुर्योधन इंगळे, बंडू महादेवराव चक्रनारायण (सर्व रा. पातूर नंदापूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख १० हजार रुपये तसेच साहित्य पाच हजार रुपयांचे असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling at Pinjar and Pathur Nandapur