सोनटक्के प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:25+5:302021-02-27T04:24:25+5:30

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने छापा ...

Raid on gambling den at Sontakke Plot | सोनटक्के प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

सोनटक्के प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने छापा टाकून पाच जुगारीना अटक केली. यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनटक्के प्लॉट येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून शेख असिफ शेख युसुफ, शेख फिरोज शेख जहीर, शेख नजीर शेख जमीर, सय्यद जियाउद्दीन सय्यद शरीफुदिन सर्व राहणार सोनटक्के प्लॉट यांना ताब्यात घेतले. यांच्याकडून रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारीविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवादविरोधी कक्षांने केली.

Web Title: Raid on gambling den at Sontakke Plot