नाजूकनगरातील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:53 IST2021-02-20T04:53:34+5:302021-02-20T04:53:34+5:30

सहा जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाजूकनगर येथे मोठ्या प्रमाणात सुरू ...

Raid on a gambling den in Najuknagar | नाजूकनगरातील जुगार अड्ड्यावर धाड

नाजूकनगरातील जुगार अड्ड्यावर धाड

सहा जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई

पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाजूकनगर येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने शुक्रवारी रात्री छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून तीन जुगारी ना ताब्यात घेण्यात आले असून, इतर तीन जुगारी फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाजूकनगर येथील शेख रशीद शेख सुलतान याच्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी छापा टाकून शेख नजीर शेख गफार (वय ३०) राहणार नाजूकनगर, सलमान खान नसीर खान (२५, रा. ताजना पेठ, सय्यद हमजा सय्यद इस्माईल (६३, रा. नाजूकनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद जुबेर महंमद इक्बाल (३६) आणि शेख रशीद शेख सुलतान (रा. नाजूकनगर) हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. यांच्यासह शेख रशीद शेख सुलतान या सहाजणांवर दहशतवादविरोधी कक्षाने कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on a gambling den in Najuknagar