लाडीस फैलातील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:35+5:302021-02-09T04:21:35+5:30

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीस फैल येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक यांच्या ...

Raid on a gambling den in Ladis spread | लाडीस फैलातील जुगार अड्ड्यावर छापा

लाडीस फैलातील जुगार अड्ड्यावर छापा

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीस फैल येथे माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने साेमवारी छापा टाकला. या ठिकाणावरून चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लाडीस फैल येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून शशिधन गाेमाजी पहूरकर, मनाेज भारतीलाल जयराज, रमेश शंकर गावडे व अतुल हरिदास उके या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून राेख रकमेसह ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगा-यांविरुद्ध आकाेट फैल पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on a gambling den in Ladis spread