दहीहंडा येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:23+5:302021-02-27T04:24:23+5:30

चार जुगारी अटकेत दहशतवादविरोधी कक्षाची कारवाई अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीहंडा येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ...

Raid on gambling den at Dahihanda | दहीहंडा येथील जुगार अड्ड्यावर धाड

दहीहंडा येथील जुगार अड्ड्यावर धाड

चार जुगारी अटकेत दहशतवादविरोधी कक्षाची कारवाई

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीहंडा येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने शुक्रवारी छापा टाकला. या ठिकाणावरून चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दहीहंडा येथे गोइंका कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून गजानन सुखदेव आठवले, सुभाष सुखराम आठवले, अरुण गुलाबराव पखले, राजेश राम शंकर मिश्रा सर्व राहणार दहीहंडा या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारीविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on gambling den at Dahihanda