चोहोटा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:31 IST2021-02-18T04:31:52+5:302021-02-18T04:31:52+5:30

नऊ जुगारी अटकेत, मुद्देमाल हस्तगत अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहोटा बाजार येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार ...

Raid on gambling den at Chohota Bazaar | चोहोटा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

चोहोटा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

नऊ जुगारी अटकेत, मुद्देमाल हस्तगत

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहोटा बाजार येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने मंगळवारी छापा टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोहोटा बाजार येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या अड्ड्यावरून बाळकृष्ण उकर्डा महातुरकर, केशव उत्तम नरवाडे, जगदीश गोवर्धन मुकुंद, ईश्वर लक्ष्मण ढोरे, गणेश गुलाबराव वहिले, सुभाष वामनराव खोडके, मधुकर गणपत पळसपगार, गोवर्धन काशिनाथ इंगळे, लक्ष्मण पटेल जोंधळे सर्व राहणार चोहोटा बाजार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात जुगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling den at Chohota Bazaar