चोहट्टा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:39+5:302021-02-27T04:24:39+5:30

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहट्टा बाजार येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने धाड ...

Raid on gambling den at Chohatta Bazaar | चोहट्टा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

चोहट्टा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोहट्टा बाजार येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने धाड टाकून पाच जुगारीना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोहट्टा बाजार येथील वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून या जुगार अड्ड्यावर शिवा रामरतन पेटे, नंदकिशोर रामराव सैरसे, अमोल रामदास बुंदे, प्रथमेश विनोद शिंदे, अमर शामलाल जामूनकर सर्व राहणार चोहट्टा बाजार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जुगारविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on gambling den at Chohatta Bazaar