भारती प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST2021-06-23T04:13:45+5:302021-06-23T04:13:45+5:30

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती प्लॉट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या ...

Raid on a gambling den at Bharti Plot | भारती प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

भारती प्लॉट येथील जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती प्लॉट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापा टाकला. या ठिकाणावरून चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भारती प्लॉट येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणावरून दीपक शालिग्राम क्षीरसागर वय ५३ वर्ष, संतोष गणपत गोरले वय ४६ वर्ष दोघही राहणार शिवनगर जुने शहर, राजेश काशीराम राठोड वय ४७ वर्ष आणि योगेश शंकरराव भुजबळे वय ४२ वर्षे दोघेही राहणार भारती प्लॉट जुने शहर या चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. या चार जणांविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on a gambling den at Bharti Plot