बाळापूर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST2021-06-28T04:14:24+5:302021-06-28T04:14:24+5:30

अकोला : बाळापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामगाव रोडवर एका शेतात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक ...

Raid on gambling den in Balapur farm | बाळापूर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

बाळापूर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

अकोला : बाळापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामगाव रोडवर एका शेतात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाळापूर खामगाव रोडवरील कृषी कार्यालयामागील कृषी कार्यालयामागे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून शेख इमरान शेख बाबा वय २९ वर्षे राहणार बाळापूर, अहमद खान अयुब खान वय ३५ वर्षे शोएब खान कासम खान वय २० वर्षे, अब्दुल सलीम अब्दुल रज्जाक वय ३० वर्षे, शांताराम महादेव उमाळे वय ३९ वर्षे व जफर शहा उस्मान शहा वय ३५ वर्षे सर्व राहणार बाळापुर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on gambling den in Balapur farm