चाेहाेट्टा बाजार येथील जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST2021-01-19T04:21:08+5:302021-01-19T04:21:08+5:30

अकाेला : दहीहांडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेहाट्टा बाजार येथील एका शेतात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख ...

Raid on gambling at Chaehatta Bazaar | चाेहाेट्टा बाजार येथील जुगारावर धाड

चाेहाेट्टा बाजार येथील जुगारावर धाड

अकाेला : दहीहांडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेहाट्टा बाजार येथील एका शेतात खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी रविवारी रात्री छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून सात जुगारींना अटक केली असून त्यांच्याकडून राेखरकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाेहाेट्टा बाजार येथील शेतात माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविराेधी पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून या ठिकाणावरून विकास हिम्मतराव खाेडके, बाबाराव हरिचंद्र अंकुरकर, गाेविंद नारायण तर्हाळे, प्रमाेद जानराव आडे, रवींद्र रामनाथ कऱ्हाळे, राजेश विनायक सुरळकर, नागाेराव ज्ञानदेव घावट या सात जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून राेखरकमेसह १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling at Chaehatta Bazaar