हरिहर पेठेतील क्लबवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST2021-01-17T04:16:33+5:302021-01-17T04:16:33+5:30

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहर पेठ येथे शकील याच्या माेठ्या जुगार अड्ड्यावर तसेच क्लबवर दहशतवादविराेधी पथकाने ...

Raid on the club at Harihar Pethe | हरिहर पेठेतील क्लबवर छापा

हरिहर पेठेतील क्लबवर छापा

अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहर पेठ येथे शकील याच्या माेठ्या जुगार अड्ड्यावर तसेच क्लबवर दहशतवादविराेधी पथकाने छापा टाकला. या क्लबवरून १० जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रकमेसह ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.

दहशतवादविरोधी पथक जुन्या शहरातील हरिहर पेठ परिसरात गुन्हेगार शोधण्यासाठी गस्तीवर असताना शकील नावाचा माफिया टेबलद्वारे क्लब चालवीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून दहशतवादविराेधी पथकाने छापा टाकून ११ जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये सुमित रवींद्र तेलनगडे, ज्ञानेश्वर भगीरथ राऊत, सुरेंद्र भीषण वानखेड़े, शेख रहेमान शेख सुलतान, गजानन लक्ष्मण वायचळ, आनंद नारायण गोहर, सत्यजित रमेश खनदे, प्रवीण सुधाकर बहेकर, आतिश गजानन गिरी, गोविंदा फोलाखडे, शकील खान रहेमान खान यांचा समावेश आहे. या जुगाऱ्यांकडून १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Raid on the club at Harihar Pethe