जनता भाजी बाजारातील चकवा जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:16 IST2021-02-08T04:16:44+5:302021-02-08T04:16:44+5:30

अकाेला : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजी बाजारात चार जण लाल पिवळ्या गाेट्यांवर नागरिकांना चकवून जुगार अड्डा ...

Raid on Chakwa Gambling in Janata Vegetable Market | जनता भाजी बाजारातील चकवा जुगारावर छापा

जनता भाजी बाजारातील चकवा जुगारावर छापा

अकाेला : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता भाजी बाजारात चार जण लाल पिवळ्या गाेट्यांवर नागरिकांना चकवून जुगार अड्डा चालवीत असतांनाच दहशतवाद विराेधी कक्षाने रविवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणावरुन चार जणांना अटक करण्यात आली आहे.

जनता भाजी बाजारातील एका दुकानासमाेर अमजद इरानी हा त्याच्या साथीदारांना साेबत घेऊन नागरिकांना चकवून आगळावेगळा जुगार चालवीत असल्याची माहिती दहशतवाद विराेधी कक्षाला मिळाली. या माहितीवरून कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह छापा टाकून चार जणाना अटक केली. यामध्ये अमजद अली, अफजल अली, जावेद अली अफजल अली व अब्दुल साबिर अब्दुल जाबिर, अंबादास रोहिदास थोरात सर्व रा इमामवाड़ा अकोटफाईल यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३ वेगवेगळ्या रंगाच्या गोट्या व राेख दाेन हजार रुपये असा एकूण दाेन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चार जणाविरुध्द जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on Chakwa Gambling in Janata Vegetable Market