राहुल गांधी यांनी केले अध्यक्षपद ग्रहण; काँग्रेस कार्यकर्त्यांचा अकोल्यात जल्लोष

By atul.jaiswal | Published: December 16, 2017 04:05 PM2017-12-16T16:05:37+5:302017-12-16T16:09:31+5:30

अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला.

Rahul Gandhi took the presidency; Congratulating Congress workers unrest | राहुल गांधी यांनी केले अध्यक्षपद ग्रहण; काँग्रेस कार्यकर्त्यांचा अकोल्यात जल्लोष

राहुल गांधी यांनी केले अध्यक्षपद ग्रहण; काँग्रेस कार्यकर्त्यांचा अकोल्यात जल्लोष

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व फटाके फोडून नाचत जल्लोष साजरा केला.महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी.आ. बबनराव चौधरी यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती.

अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला.
स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणात झालेल्या या जल्लोष सोहळ्यात महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी.आ. बबनराव चौधरी,अविनाश देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, नगरसेविका विभा राऊत,महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा डॉ.संजीवनी बिहाडे, महिला अध्यक्षा साधनाताई गावंडे, डॉ.वर्षा बडगुजर,अ‍ॅड. महेश गणगणे, माजी.जी.प. सभापती पंढरी हाडोळे, माजी जि.प.सदस्य आलमगीर खान आदींच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व फटाके फोडून नाचत जल्लोष साजरा केला. देशाला राहुल गांधी सारख्या कणखर नेतृत्वाची गरज होती ती गरज त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या पद ग्रहणाने पूर्ण झाली असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे बबनराव चौधरी यांनी सांगून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अविनाश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत खा. राहुल गांधी यांच्या संघटनात्मक कायार्ची जाणीव करून देत त्यांच्या विचारावर कार्यकर्ते चालून पक्षीय जनाधार वाढणार असल्याचे सांगीतले. यावेळी तश्वर पटेल, जितेंद्र बगाटे, रहमान बाबू, यासिन उर्फ बबूभाई, नागसेन शिरसाट, इस्माईल टीव्हीवाले, बबलू शेख, राजू इटोले, गजूभाऊ इंगळे, इस्माईल ठेकेदार ,मेहमूद खान पठाण,अश्फाक अली शाह, ख्वाजा कुरेशी, महेंद्र सुतार, बबलू शेख, सय्यद जाफर, कमर हुसेन, पिंटू अंजनकर,आकाश शिरसाट,नीलकंठ तायडे, प्रमोद बनसोड, खलीक साहेब, नरेंद्र देशमुख, देविदास कोकाटे, विजया राजपूत, पुष्पा देशमुख, अर्चना राऊत, शिवानी किटे समवेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rahul Gandhi took the presidency; Congratulating Congress workers unrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.