राहुल गांधी आज बुलडाण्यात

By Admin | Updated: October 12, 2014 00:44 IST2014-10-12T00:44:03+5:302014-10-12T00:44:03+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा.

Rahul Gandhi today bulldoze | राहुल गांधी आज बुलडाण्यात

राहुल गांधी आज बुलडाण्यात

बुलडाणा : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज काँग्रेस उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी येत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारार्थ होणारी राहुल गांधी यांची जाहीर सभा उद्या १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात होत आहे. त्यांच्या समवेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सातही विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी दिली. दरम्यान, या प्रचारसभेसाठी पोलीस प्रशासनाने आज सहकार विद्यामंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली.

Web Title: Rahul Gandhi today bulldoze