रुग्णाला बघण्यासाठी नातेवाईकाचा जीएमसीत राडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST2021-04-25T04:17:43+5:302021-04-25T04:17:43+5:30
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २९ मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून या ठिकाणी कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवर उपचार केला ...

रुग्णाला बघण्यासाठी नातेवाईकाचा जीएमसीत राडा!
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २९ मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून या ठिकाणी कोविडच्या अतिगंभीर रुग्णांवर उपचार केला जातो. या ठिकाणी रुग्णावर उपचार होत नाही, असे म्हणत रुग्णाच्या नातेवाईकाने अतिदक्षता विभागात जाण्याचा हट्ट केला होता. परंतु, त्याला आत जाण्यास नकार दिल्याने त्याने वॉर्ड क्रमांक २९ च्या खिडकी आणि दरवाजाच्या काचा फोडल्याचा प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास घडला. या घटनेत वॉर्डातील महिला सुरक्षा रक्षकाच्या हाताला आणि डोक्याला काच लागल्याने त्या जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी जखमी महिला कर्मचाऱ्याने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम यांनी घटनास्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्था आणखी चोख करण्याचे निर्देश दिले.