रेबीजने देशात होतोय दरवर्षी २० हजारांवर लोकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:28 IST2018-09-28T15:10:59+5:302018-09-28T15:28:50+5:30

रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोग होतो.

Rabies is killing every 20,000 people in the country every year | रेबीजने देशात होतोय दरवर्षी २० हजारांवर लोकांचा मृत्यू

रेबीजने देशात होतोय दरवर्षी २० हजारांवर लोकांचा मृत्यू

ठळक मुद्देदरवर्षी २० हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. जागतिक रेबीज दिनानिमित्त शुक्रवार,२८ सप्टेंबर रोजी मोफत रेबीज रोगप्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

अकोला : पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून, पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशू चिकित्सालयामध्ये जागतिक रेबीज दिनानिमित्त शुक्रवार,२८ सप्टेंबर रोजी मोफत रेबीज रोगप्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोग होतो. त्यामुळे जगात ५२ ते ५४ हजार लोक मृत्युमुखी पडतात. ५४ हजारांपैकी भारतात दरवर्षी २० हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे हे प्रमाण ३६ टक्के आहे. या रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून कुत्र्यांना रेबीज रोग प्रतिबंधक लस देणे अनिवार्य आहे.
२८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन आहे. यानुषंगाने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्यावतीने मोफत लसीकरण करू न दिले जाणार असून, कुत्र्यांची आरोग्य तपासणी, त्यांची निगा, होणारे विविध घातक रोग व त्याचा प्रतिबंध इत्यादीबाबत पशू चिकित्सालयाचे तज्ज्ञ डॉक्टर श्वान संगोपनावर अद्ययावत माहिती देणार आहेत. चिकित्सालय अधीक्षक डॉ. एस. पी. वाघमारे, डॉ.एम. जी. थोरात, डॉ. सी.एच. पावसे, डॉ. के.एस. पजई, डॉ. एम.एफ. सिद्दिकी, डॉ. एम.व्ही. इंगवले, डॉ. एस.जी. देशमुख, डॉ.एस.डी. चपटे, डॉ. फरहीन फानी, डॉ. एम. जी. पाटील या तज्ज्ञांनी यासाठीची जय्यत तयारी केली आहे.
- रेबीज हा जीवघेणा रोग असून, कुत्र्यांपासून तो मानव व पशूंना होतो. जगाच्या तुलनेत भारतात या रोगाचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे श्वानप्रेमींनी कुत्र्यांची निगा राखावी व रेबीज लसीकरण करू न घ्यावे, हे लसीकरण मोफत आहे.
डॉ. हेमंत बिराडे,
अधिष्ठाता,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,
अकोला .
 

Web Title: Rabies is killing every 20,000 people in the country every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.