रब्बीचेही उत्पादन घटणार; हरभरा पिकांची वाढ खुंटली, गहू पिकालाही धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:28 IST2020-01-21T18:28:31+5:302020-01-21T18:28:46+5:30
यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिके पेरणीला एक ते दीड महिन्याचा विलंब झाल्याने हरभरा,गहू पिकांची वाढ खुंटली असून, किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीचेही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे

रब्बीचेही उत्पादन घटणार; हरभरा पिकांची वाढ खुंटली, गहू पिकालाही धोका
अकोला : यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिके पेरणीला एक ते दीड महिन्याचा विलंब झाल्याने हरभरा,गहू पिकांची वाढ खुंटली असून, किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीचेही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील हरभरा पिकाला संरक्षित ओलीत करण्यात येत आहे. तथापि, उशिरा पेरणी झाल्याने उत्पादन किती होईल, हे सांगता येणार नाही.
हरभरा पेरणी यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यात आली. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात आली; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहेत. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. घाटेअळीने तोंड वर काढले आहे. खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन घटल्याने रब्बीतील पिकांवर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे; परंतु निसर्ग साथ देत नसल्याचे चित्र आहे.
पाऊस व ढगाळ वातावरण आणखी आहेच त्याचाही पिकाच्या वाढीवर परिणाम होत असून, हे वातावरण पिकांवरील किडींना पोषक ठरत असल्याने हरभºयावर घाटेअळी आली आहे. अनेक भागात हरभरा पीक वाढत नसल्याचे चित्र आहे. किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. विदर्भात यावर्षी गहू, हरभर पिकाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे या शेतकºयांची चिंता वाढली आहे.
उशिरा पेरणी आणि सतत ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे. हे वातावरण निवळून तापमान वाढले तर या पिकांची वाढ
होण्यास मदत होईल.
- डॉ. अर्चना थोरात,
हरभरा पैदासकार,
कडधान्य संशोधन विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.