वऱ्हाडात ६ लाख हेक्टर होणार रब्बीची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:48 PM2019-11-13T15:48:54+5:302019-11-13T15:49:04+5:30

नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी हरभरा पिकासह गव्हाचा पेरा वाढणार आहे.

Rabbi sowing will be 6 lakh hectares in Warhada! | वऱ्हाडात ६ लाख हेक्टर होणार रब्बीची पेरणी!

वऱ्हाडात ६ लाख हेक्टर होणार रब्बीची पेरणी!

Next

अकोला: परतीचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारा असल्याने पश्चिम (वºहाड) विदर्भात ६ लाख हेक्टरवर पेरणी वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून, यावर्षी हरभरा पिकासह गव्हाचा पेरा वाढणार आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतही वार्षिक सरासरी भरून काढणारा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. परतीच्या पावसानेही बºयापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. वºहाडातील अरुणावाती हा मोठा प्रकल्प सोडला तर इतर जवळपास प्रकल्प ओव्हरफ्लो’ झाले असून, वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग, उडीद काढलेल्या क्षेत्रावर हरभरा व जेथे सिंचनाची सोय आहे, तेथील शेतकºयांनी गहू पिकाचे नियोजन करू न पेरणीची तयारी केली. काही ठिकाणी पेरणीस प्रारंभही झाला आहे. हरभरा पीक पेरणी मोठ्या प्रमाणावर होत असते. तथापि, गत काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे हे पीक शेतकºयांना घेता आले नव्हते. यावर्षी पोषक स्थिती निर्माण झाली असून, त्यादृष्टीने कृषी विभाग व शेतकºयांनी नियोजन केले आहे. यावर्षी रब्बी ज्वारीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. खारपाणपट्ट्यात ज्वारीची पेरणी करण्यात येणार आहे. यावर्षी गहू पिकाला पाणी मिळण्याची शक्यता असल्याने गव्हाचे क्षेत्रदेखील वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वºहाडात बुलडाणा जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर, अकोला २ लाख हेक्टर तर वाशिम जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही पेरणी वाढणार आहे; परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती या मोठ्या प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा आहे.

यावर्षी पूरक पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना वेळेवर खते मिळावी, यासाठीचेही नियोजन खते नियंत्रण समिती करणार असून, खताचा पुरवठा कधी व किती उपलब्ध झाला, कोणत्या विक्रेत्याकडे किती विक्रीस दिला, याचाही यावर्षी ताळेबंद ठेवला जाणार आहे.
- मोहन वाघ,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
-------------------------------------------------------------------------------------------

 

Web Title: Rabbi sowing will be 6 lakh hectares in Warhada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.