Pulwama Terror Attack : अकोटात पाक पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 16:53 IST2019-02-15T16:52:05+5:302019-02-15T16:53:34+5:30
हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवाजी चौकात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Pulwama Terror Attack : अकोटात पाक पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
अकोट (जि. अकोला) : जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा अकोट शहरात शिवसेनेच्यावतीन जाहीर निषेध करण्यात आला. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवाजी चौकात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला आघाड़ी जिल्हा संघटिका माया म्हैसने, युवसेना विस्तारक राहुल कराळे, तालुका प्रमुख शाम गावंडे, आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने, जिल्हा उप संघटक विक्रम जायले यांच्यासह शिवसनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.