पुजा-याची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 23, 2015 02:18 IST2015-12-23T02:18:34+5:302015-12-23T02:18:34+5:30

शेगाव येथील घटना; आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार.

Pujya's suicide; Five accused filed | पुजा-याची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

पुजा-याची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा दाखल

शेगाव (जि. बुलडाणा): शहरातील आकोट रोडवर असलेल्या लाल बाबा देवीच्या मंदिरातील पुजार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ६ च्या सुमारास निदर्शनास आली आहे; परंतु ही आत्महत्या नसून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप नातलगांनी केला असून, त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करून शहरातील पाच आरोपींच्या नावाने तक्रार दिली आहे. फिर्यादी गजानन वसंता कुलकर्णी रा. शेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली की, त्यांचे जावाई राजेश शंकरराव राजवैद्य हे लालबाबा मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान, प्लॉटच्या कागदपत्रावरून व पैशाच्या कारणावरून शहरातील गणेश सोलनकर, नितीन बर्वे, सचिन बर्वे, आकाश देवकते, कैलास देशमुख हे त्यांना सतत त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या जावयाने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून ३0६,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते.

Web Title: Pujya's suicide; Five accused filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.